बल्लारपूर पॉवर हाऊस परिसरात दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने हल्ल्यात एएसआई चा या मृत्यू
◾पोलीस कर्मचार्यावर धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास चंद्रपूर वरून बल्लारपूर ला आपल्या कर्तव्यावर येत असतांना एका पोलीस कर्मचार्यावर बल्लारपूर पॉवर हाऊस परिसरात दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने हल्ला केल्यामुळं एएसआई अविनाश पडोळे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाल्याचे वृत्त येऊन धडकले.
याविषयीच्या अधिक माहितीनुसार एएसआय अविनाश पडोळे हे आपल्या दुचाकी क्रमांक MH 34 AT 2057 ने चंद्रपूर वरून बल्लारपूर ला जात असताना टोल नाका ते पॉवरहाऊस परिसरात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने चालत्या दुचाकीवर अचानक हल्ला केल्यामुळं खाली पडले व या अपघातात ते गंभीर जखमी झाले अपघातग्रस्ताला त्वरित ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे दाखल केले प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं या एकाएकी झालेल्या हल्ल्यामुळे रात्रीच तर सोडा दिवसा सुध्दा रोज चंद्रपूर बल्लारपूर जाण येणं करणाऱ्या मध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे वन्यप्राण्यांच्या अशा होणाऱ्या हल्ल्यापासून रोखण्यासाठी वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी जनसामान्य नागरिकांकडून होत आहे.


0 Comments