चोरांच्या बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांसोबत चर्चासत्र व बैठकीचे आयोजन.स्तुत्य उपक्रम

 


चोरांच्या बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांसोबत चर्चासत्र व बैठकीचे आयोजन. स्तुत्य उपक्रम

◾दोन महिन्यांमध्ये एकूण सहा घरी  चोरट्यांनी घरफोडी केली 


ब्रम्हपुरी ( राज्य रिपोर्टर ) : गत काही दिवसांपासून ब्रम्हपुरी मधील विदर्भ इस्टेट सोसायटी मध्ये जसजशी थंडी वाढू लागली तसतसे चोरीचे प्रमाण वाढले दिसून येत आहे. अवघ्या दोन महिन्यांमध्ये एकूण सहा घरी  चोरट्यांनी घरफोडी केली असून काही पैसे दागदागिने तसेच काही सापडले नाही तर घरातील कपडे व इतर वस्तू चोरी केलेल्या आढळून आलेले आहे.त्यामुळे वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये एकप्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.चोरांच्या बंदोबस्त करण्यासाठी तातडीने एक बैठक घेऊन चर्चा करण्यात आली असून चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.तसेच सी सी टीव्ही कॅमेरा लावणे काळाची गरज आहे असे वक्तव्य ठाणेदार रोशन यादव साहेब पोलिस स्टेशन ब्रम्हपुरी ह्यानी केले.याप्रसंगी सोसायटीतील प्रमुख मान्यवर,विदर्भ इस्टेट चे अध्यक्ष अमित करमरकर, ठाणेदार रोशन यादव साहेब ,पी आय बोरकर सर,सामाजिक कार्यकर्त्या तुलेश्र्वरी बालपांडे, बोरकर मॅडम उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments