बल्लारपूर बामणी प्रोटिन्सच्या मागे एका व्यक्तीचा मृतदेह सापडला
◾वाघाने हल्ला केल्याचा संशय घातपात शवविच्छेदन झाल्यावर पूर्ण तपशील मिळेल
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर बामणीच्या शिवशक्ती नगर निवासी असलेले चंदन महादेव नारनवरे वय-३४ वर्ष हे इसम १३ डिसेंम्बर २०२१ पासून हरवले होते. त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते मात्र काहीच पत्ता लागत नव्हता मात्र आज २१ डिसेंम्बरला बामणी प्रोटिन्सच्या मागच्या परिसरात सडलेल्या हाडाचा सांगाळा, शीर व कपड्यावरून मृतकाची ओळख पटली असून सदर मृतदेह चंदन महादेव नारनवरे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. झाडी-झुडुपात चंदनचा मृतदेह कसा गेला चंदनवर वाघ किंवा बिबट्याने हल्ला तर केला नाही ना? असा अंदाज लावण्यात येत आहे याबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर मृतकाच्या शवाचे शवविच्छेदन झाल्यावर पूर्ण तपशील मिळेल यावरून चंदनचा मृत्यू वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झाला की घातपात ही बाब शवविच्छेदन अहवालानुसार सांगता येईल अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली.


0 Comments