चंद्रपुरात घरफोडी व चैन स्नॅचिंग प्रकरणी स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई

 


चंद्रपुरात घरफोडी व चैन स्नॅचिंग प्रकरणी स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई 

◾४ अल्पवयीन आरोपीसह ३ आरोपीना अटक व २ लाख रु चा मुद्देमाल जप्त 

◾गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने बल्लारपूर शहरातील गोल पूल परिसरात पेट्रोलिंग

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून होत असलेल्या घरफोडी व चैन स्नॅचिंग प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास सुरू होता विशेष बाब म्हणजे गोपनीय सूत्राच्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने बल्लारपूर शहरातील गोल पूल परिसरात पेट्रोलिंग दरम्यान अल्पवयीन मुलाला विचारपूस केली असता त्याने चंद्रपूर शहरातील गंजवार्ड येथे एका गोदामातून आपल्या ४ साथीदारासह ३२ तेलाचे पिपे चोरी केली असल्याची कबुली दिली त्याच्याकडून विविध कँपनीचे  ११ तेलाचे पिपे, गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी, २ मोबाईल संच असा एकूण १ लाख १४ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

        तर दुसऱ्या एका घटनेत रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत बंगाली कॅम्प परिसरात एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन व मोबाईल लंपास करणाऱ्या नेहरू नगर येथे वास्तव्य करणारा संभा कुंडलिक पोटे याला अटक करण्यात आली असून आरोपी जवळून ७ ग्राम ची सोन्याची चैन व १ मोबाईल संच असा एकूण ४५ हजार रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर तिसऱ्या गुन्हात गोंदिया जिल्ह्यातील दुग्गीपार पोलीस स्टेशन हद्दीत सोंदड परिसरात एका घरातून HP कंपनीचा लॅपटॉप व चांदीचे दागिने चोरी करून चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात विकण्याचा प्रयत्नातून संशयास्पद रीतीने फिरतांना स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली व त्यांचेकडून एचपी कंपनीचा लॅपटॉप अंदाजित किंमत ५० हजार रु चा मुद्देमाल जप्त करण्यात येवून सदर आरोपीला गोंदिया पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सदर तिन्ही गुन्ह्यात ४ अल्पवयीन व ३ आरोपी कडून एकूण २ लाख  ९ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई मा.अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा.अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे नेतृत्वात संदीप कापडे, संजय आंतकुलवार, नितीन रायपुरे, कुंदनसिंग बावरी, गोपाल आंतकुलवार, रवींद्र पंधरे, प्रांजल झिलपे, अर्पणा मानकर ई नी केली.

Post a Comment

0 Comments