चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर भीषण अपघात : कंटेनर पलटी झाला १ गंभीर जखमी

 


चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर भीषण अपघात : कंटेनर पलटी झाला १ गंभीर जखमी

◾कार चालक गंभीर जखमी

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर भीषण अपघात झाला असून कंटेनर पलटी झाला असल्याचे वृत्त आहे आज सायंकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर दर्गा परिसरात रस्ता अपघात झाला कंटेनर क्रमांक MH-40 AT 6656 एका कार च्या वरती पलटी झाल्यामुळे कार चालक गंभीर रित्या जखमी झाला असून त्यांचेवर ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे प्राथमिक उपचार सुरू असून पुढील उपचारार्थ चंद्रपूरला रेफर करण्याची शक्यता आहे. सदर अपघात आज सायंकाळी ७:३० वा घडला असून विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार बल्लारपूर-चंद्रपूर मार्गाने रिकामा जात असलेला कंटेनर अतिशय वेगाने जात असताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे सदर अपघात घडला सदर अपघाताचे वृत्त कळताच बल्लारपूर पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचली व वाहतूक विभागाच्या पोलीसांनी सदर घटनेवर नियंत्रण प्राप्त केले असून सदर अपघाताचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments