चंद्रपूर-मूल मार्गावर भीषण अपघात दोघांचा घटनास्थळी मृत्यू
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर-मूल मार्गावर काल मंगळवार रात्री ९:०० ते ९:१५ वाजताच्या दरम्यान घंटाचौकी जवळ दुचाकी व चारचाकी चा भीषण अपघात झाला आहे यात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे सूत्राच्या माहितीनुसार भीमराव तोंडास व सलीम शेख हे एका विवाह सोहळा आटोपून चंद्रपूर वरून मूल ला परत येत असतांना तसेच चारचाकी वाहन हे मूल वरून चंद्रपूरला जात असतांना या दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकी चालकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला या घटनेची माहिती पोलिसांना कळताच रामनगर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी चौकशीला सुरुवात केली सदर अपघात घडताच चारचाकी चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे वृत्त आहे.


0 Comments