राजुरा लगतच्या जंगलात कारने घेतला पेट – चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : राजुरा आसिफाबाद राज्य महामार्गावर संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास फोर्ड कंपनीच्या एका चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.
सविस्तर वृत्त असे की, राजुरा येथिल जनपल्लीवार नामक युवक संध्याकाळी 5:45 च्या सुमारास आपल्या फोर्ड कंपनीच्या MH 02 BJ 9755 क्रमांकाच्या कारने विरूरा स्टेशन येथे जाण्यास निघाला असता सुमठाणा टी पॉईंट पासुन जवळपास अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर त्याला कारच्या समोरच्या भागातून धूर निघत असल्याचे जाणवले.
कार मधे काहीतरी जळत असल्याची जाणीव होताच त्याने रस्त्याच्या कडेला कार उभी करून तत्काळ सोबत असलेल्या मित्रासह बाहेर बाहेर पडला व कार बंद केली. आग विझविण्यासाठी कार चे बॉनेट उघडण्याचा प्रयत्न करूनही बॉनेट उघडण्यात यश आले नाही. दरम्यान कारला आग लागल्याचे कळताच काही वाहने थांबली व ही माहिती मिळाल्यामुळे राजुरा येथिल काही युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. उपस्थितांनी महत्प्रयासाने कारचे बॉनेट उघडले व जाणार्या ट्रक थांबवून त्यांच्याकडील पाणी घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कारने चांगलाच पेट घेतला होता. ह्या आगीत कारची बॅटरी जळाली त्याचप्रमाणे इतर भाग सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असुन ह्या आगीत कारचे पन्नास हजारपेक्षा जास्त नुकसान झाले असण्याची शक्यता आहे मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही अप्रिय घटना घडली नाही हे विशेष.


0 Comments