बल्लारपूर शहरात प्रथमच नगरपालिका द्वारा डिजिटल शाळेचे निर्माण मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतुन शासनाच्या वैशिष्ठ्यपुर्ण विशेष निधी अंतर्गत निर्माणाधिन डिजीटल शाळेला मा.चंदनभैय्या चंदेल व नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांची भेट
◾डिजिटल शाळेमुळे आधुनिक शिक्षण प्रणाली आत्मसात करण्यास विद्यार्थ्यांना सोयीचे होईल - हरीश शर्मा
◾माजी अर्थ नियोजन व वनमंत्री मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतुन शासनाच्या वैशिष्ठ्यपुर्ण विशेष निधी अंतर्गत
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील गौरक्षण वार्डात निर्माणाधीन असलेल्या डिजिटल शाळेला वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मा.चंदनभैय्या चंदेल व नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांनी भेट देऊन पहानी केली.याप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांना या डिजिटल शाळेच्या बांधकामा संबधी उर्वरित कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याकरिता सूचना केल्या.
बल्लारपूर शहरात प्रथमच नगरपालिका द्वारा डिजिटल शाळेचे निर्माण करण्यात येत आहे.ज्यामुळे आधुनिक शिक्षण प्रणाली आत्मसात करण्यास विद्यार्थ्यांना सोयीचे होईल.यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.विजय सरनाईक,बांधकाम विभागाचे श्री.मुत्यालवार,श्री.राऊत,श्री.बोढे,श्री.जामुनकर,इलेक्ट्रीक विभागाचे श्री. महेश वानखेडे,संघनक विभागाचे श्री.टोंगे तसेच कंत्राटदार उपस्थित होते.


0 Comments