माजी.अर्थ,नियोजन व वनमंत्री मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन वैशिष्ट्यपुर्ण विशेष निधी अंतर्गत निर्माणाधीन असलेल्या आधुनिक जीमला नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांची भेट
◾नागरिकांना उत्तम आरोग्याची निघा राखण्याकरिता नगर परिषद तर्फे नागरिकांच्या सेवेत लवकरच आधुनिक जीम लोकार्पित होईल - हरीश शर्मा
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : माजी.अर्थ,नियोजन व वनमंत्री मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन शासनाच्या वैशिष्ट्यपुर्ण विशेष निधी अंतर्गत नगर परिषद बल्लारपूर तर्फे नागरिकांना उत्तम आरोग्याची निघा राखण्याकरिता गांधी कॉम्प्लेक्स जुने बस स्टॉप व्यापारी संकुलात आधुनिक जीमचे निर्माण करण्यात येत आहे.
या निर्माणाधीन जीमला नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी भेट देऊन पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना उत्तम दर्जेने जीमचे निर्माण करावे करिता काही महत्त्वाच्या सूचना केल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी लवकरच ही जिम नागरिकांच्या सेवेत लोकार्पित होईल व व नागरिकांना यांचा लाभ मिळेल,या अगोदरही नगरपालिके द्वारा ठीक ठिकाणी ग्रीनजीम नागरिकांच्या सेवेत रुजू करण्यात आले आहेत ज्याचा लाभ नागरिकांना होत असल्याचे सांगितले.याप्रसंगी न.प.चे अभियंता जाभुंळकर साहेब,हरेराम सिंग उपस्थित होते.


0 Comments