बल्लारपूर शहरातील बीटीएस प्लॉट परिसरात आपसी वादातून लोखंडी रॉड ने हल्ला करून गंभीर जखमी केली
◾आपसी वादातून लोखंडी रॉडने हल्ला
◾गंभीर जखमी चंद्रपुरात उपचार सुरू : 2 आरोपी अटकेत
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील बीटीएस प्लॉट परिसरात आपसी वादातून लोखंडी रॉड ने हल्ला करून गंभीर जखमी केली असल्याची घटना 30 ऑक्टोम्बर 2021 रोजी सायंकाळी 5 : 00 वाजताच्या दरम्यान घडली या घटनेत फिर्यादी कुंथकरणं अवसेफ बेंन्नी वय 50 वर्ष, रा.बीटीएस प्लॉट, शिवाजी वॉर्ड, बल्लारपूर असून सूत्राच्या माहितीनुसार आरोपींचे ( भंगार ) स्क्रॅप मटेरियल चे गोडावून असून त्यांच्या काही सामान सदर ठिकाणी आले होते मात्र वाहन गोडावून पर्यंत जाण्यासाठी रस्ता अपुरा पडत होता.
फिर्यादीचे काही सामान रस्त्यावर असल्याने आपसी विवादातून सदर हल्ला झाला असून या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त असून जखमींवर चंद्रपुरात उपचार सुरू आहे या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून नामे 1 ) जावेद सलिम खान, वय 39, रा.दादाभाई नवरोजी वॉर्ड बल्लारपूर, 2 ) सय्यद युनूस सय्यद युसूफ वय 30 वर्ष रा.श्रीराम वॉर्ड, बल्लारपूर, 3 ) वसीम सलीम खान रा. दादा भाई नवरोजी वॉर्ड बल्लारपूर, 4 ) कलीम सलीम खान रा.दादाभाई नवरोजी वॉर्ड बल्लारपूर, जावेद व सय्यद युनूस या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून यांचे विरुध्द 31 ऑक्टोम्बर 2021 रोजी 00 /32 वाजताच्या दरम्यान 1218/21 नुसार कलम 307,323, 427,143,147,148 भा.द.वी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यांना पोलीस कस्टडी घेण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेंद्र ठाकरे करीत आहे.


0 Comments