देवदूत बनून वाचविला महिलेचा जीव मुंबई येथे कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
बल्लारपूर तालुका विसापूर येथील आरपीएफ जवान मंगेश नागोबा थेरे
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : वर्तमान युग हे स्पर्धा परीक्षेचे युग म्हणून ओळखले जाते व याद्वारे विसापूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आभ्यासिकेचा विद्यार्थी असलेला मंगेश नागोबा थेरे हा मुंबई येथे कल्याण रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असतांना देवदूत बनून एका महिलेचा जीव वाचविला असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.
या विषयीच्या अधिक माहितीनुसार २९ सप्टेंबर २०२१ ला मुंबईच्या कल्याण रेल्वे स्थानकावर चुकीच्या रेल्वे गाडीत बसले असल्याचे एका महिलेला लक्षात आल्यावर धावत्या रेल्वेतुन उतरण्याचा प्रयत्न केला असता तोल जाऊन ती महिला रेल्वे खाली येणार तोच प्रसंगावधान राखून नुकताच रेल्वेच्या आरपीएक मध्ये कर्तव्यावर असलेला मंगेश नागोबा थेरे याने देवदूतासारखं येऊन त्या महिलेचा जीव वाचविला या जवानांच्या कृत्याबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे तसेच विसापूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेने या घटनेबाबत मंगेश थेरे याचा अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला तसेच आज महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने कल्याण रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आल्याची माहिती विसापूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे अध्यक्ष सुभाष भटवलकर, विसापूर गावातील सरपंच वर्षा कूळमेथे व उपसरपंच अनेकेश्वर मेश्राम यांनी दिली आहे.










0 Comments