म.रा.मराठी पत्रकार संघातर्फे मुख्याध्यापक काळबांडे यांचा सत्कार
भद्रावती ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हा शाखा चंद्रपूर व तालुका शाखा भद्रावती यांच्या तर्फे भटाळा येथील जि. प. हायस्कुलचे मुख्याध्यापक रवींद्र काळबांडे यांचा येथील मुरलीधर पाटील गुंडावार मंगल कार्यालयात नुकताच सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक काळबांडे यांच्या वाढदिवसाचे व सेवानिवृत्तीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून सत्कारमूर्ती मुख्याध्यापक रवींद्र काळबांडे,
म.रा. मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील बोकडे, कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया, केंद्रिय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा प्रमुख विनायक गरमडे, शमा काळबांडे,कार्तीक काळबांडे व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन मुख्याध्यापक काळबांडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विविध संघटनांतर्फे काळबांडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांनी काळबांडे यांनी केलेल्या कार्याचा गौरव करुन त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन म.रा.म.पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य रुपचंद धारणे यांनी केले. तर आभार तालुका अध्यक्ष शंकर बोरघरे यांनी मानले. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे सदस्य, शिक्षक व मित्रमंडळी उपस्थित होते.
भटाळा येथेही झाला सत्कार मुख्याध्यापक रवींद्र काळबांडे यांना सेवानिवृत्तीनिमित्य जि.प.हायस्कुल तर्फे सपत्निक सत्कार करुन भावपूर्ण निरोप देण्यात आला.यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून काळबांडे सरांचे जल्लोषात स्वागत केले. तसेच शाळेच्या वतीने काळबांडे आणि त्यांच्या सहचारिणी शमा काळबांडे यांचा शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी काळबांडे आणि सर्व पाहुणे मंडळींचे मिष्ठान्न भोजन देऊन आदरातिथ्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक मनोज भैसारे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक सुरेश सातपुते उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन के.जे.सातपुते यांनी केले.तर आभार जी.एस.भैसारे यांनी मानले.










0 Comments