जिल्हाधिकारी यांनी वन्यप्राण्यांसाठी श्रमदानातून बांधला 50 मीटर लांबीचा वनराई बंधारा

 


जिल्हाधिकारी यांनी वन्यप्राण्यांसाठी श्रमदानातून बांधला 50 मीटर लांबीचा वनराई बंधारा 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर मधील वनपरिक्षेत्र बल्हारशाह अंतगत नियतक्षेत्र इटोली कक्ष क्र. 508  हत्ती नाल्यावर वनराई बंधारा श्रमदानातून दि.31 ऑक्टोबर 2021 रोजी तयार करण्यात आले.सदर वनराई बंधारा मा.श्री. अजय गुल्हाने,जिल्हधिकारी, चंद्रपूर, मा.श्री. अरविंद मुंढे,उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर मा.डा. दीप्ती सूर्यवंशी-पाटील,उपविभागीय अधिकारी ( राजस्व ) ,बल्हारपूर मा.श्री. संजय राईचवर, तहसीलदार बल्हारपूर,सौ.संगीता श्रावण सातपुते, सरपंच, ग्रा.पं. इटोली याचे प्रमुख उपस्थितीत श्रमदानातून तयार करण्यात आले.

                      उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सर्वप्रथम मा.श्री.अजय गुल्हाने,जिल्हाधिकारी, चंद्रपुर याचे शुभ हस्ते एक वड वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.त्यानंतर इटोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, वनविभागाचे कर्मचारी, कृषी विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी व सेव फॉरेस्ट, सेव चंद्रपूर या अशासकीय संस्थेचे पदाधिकारी वनराई बंधारा निर्माण कार्यात सहभागी झाले.साधारणतः 50 मी.लांबीचे व 2.5 मी.रुंदीचे वनराई बंधारा श्रमदानातून तयार करण्यात आले.सदर वनराई बंधारा तयार करण्यासाठी खाली सीमेंट बोरी 1500 नग स्थानिक नाल्यातील रेती व मातीचा वापर करण्यात आला.यामुळे हत्तींनाल्यातील पाणी अडविला जावून यामुळे वन्यप्राणी तसेच पाळीव प्राणी यांची तृष्णातृप्ती भागविण्याकरिता मोलाची मदत होईल.

                मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी उपस्थिता सँबोधित करताना प्रतिपादन केले की सदर वनराई बंधारा अतिशय उत्कृष्ट झाला असून हे तयार करण्याकरिता कोणत्याही निधीचा वापर करण्यात आला नाही या बंधाऱ्यांमुळे वन्यप्राणी तसेच रब्बी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे पाण्याची सोय उपलब्ध करता येणे शक्य झाले आहे.लोकसहभागातून वनराई बंधारे तयार करणे या स्तुत्य उपक्रमात वनविभाग उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामे केली याबद्दल वणविभागाचे कौतुक मा.जिल्हधिकारी यांनी केले.

             श्रमदानातून वनराई बंधारा तयार करण्याचे काम श्री. संतोष थिपे,वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र बल्हारशाह वनकर्मचारी व स्थानिक इटोली ग्रामस्थ यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले.

Post a Comment

0 Comments