बल्लारपूर तहसील कार्यालय तर्फे राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या एकूण 49 लाभार्थ्यांना प्रत्येकी रक्कम 20000/- रुपये चे धनादेश सुपूर्द

 


बल्लारपूर तहसील कार्यालय तर्फे राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या एकूण 49 लाभार्थ्यांना प्रत्येकी रक्कम  20000/- रुपये चे धनादेश सुपूर्द 

◾मा. ना. सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष, लोकलेखा समिती, महाराष्ट्र विधानमंडळ यांचे हस्ते  धनादेश सुपूर्द करण्यात आले.


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : शुक्रवार रोजी मा. ना. सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष, लोकलेखा समिती, महाराष्ट्र विधानमंडळ यांचे हस्ते बल्लारपूर तहसील कार्यालय  तर्फे राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या एकूण 49 लाभार्थ्यांना प्रत्येकी रक्कम रुपये 20000/- रुपये  चे धनादेश सुपूर्द करण्यात आले. दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू  झाल्याने त्यांच्या वारसांना सदर धनादेश वितरीत करण्यात आले.

 सदर कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून डॉ. दिप्ती सुर्यवंशी उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, श्री. चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य तसेच श्री. उमेश पाटील पोलिस निरीक्षक, श्रीमती. वैशाली सातारे बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संजय राईंचवार तहसीलदार बल्लारपूर यांनी आणि संचालन श्रीमती. प्रियंका खाडे पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय बल्लारपूर यांनी तसेच आभार प्रदर्शन श्री. अजय मेकलवार, अव्वल कारकून तहसील कार्यालय बल्लारपूर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री. अजय गाडगे अ. का. दीपक वडुले महसूल सहा यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments