बल्लारपूर शहरातील झाकीर हुसैन वार्डात हायमास्ट लाईटचे लोकार्पण
🔸शहरात रस्ते,भुमिगत नाली,पाथवे,ग्रिन जिम,सार्वजनीक स्थळांचे व चौकांचे सौदर्यीकरण, बगीचे,एलईडी स्ट्रीट लाईट अश्या अनेक विकास काम सर्वांगीन विकासा करिता कटीबध्द - हरीश शर्मा नगराध्यक्ष
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपुर शहरात रस्ते,भुमिगत नाली,पाथवे,ग्रिन जिम,सार्वजनीक स्थळांचे व चौकांचे सौदर्यीकरण, बगीचे,एलईडी स्ट्रीट लाईट अश्या अनेक विकास कामातुन बल्लारपुर शहर हे सुंदर शहरात गणले जात आहे.
त्याच विकास कामाचा भाग आज झाकीर हुसैन वार्डातील सिताबाई सावकार यांच्या घराजवळील चौकात हायमास्ट लाईट लावण्यात आले ज्यामुळे या प्रमुख स्थळातील परिसर रोशनायीने जगमगत आहे.
या हायमास्ट लाईट चे लोकार्पण मा.चंदनभैय्या चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ यांच्या हस्ते व मा.हरीश शर्मा नगराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी भाजपा स्वच्छता अभियानाचे जिल्हा संयोजक श्री.शिवचंद द्विवेदी,नगर सेवक सौ.आशाताई संगीडवार,सौ.मिन्नाताई बहुरीया,श्री.सागर राउत, तसेच श्री.राजुभाऊ बहुरीया,आदीत्य शिंगाडे व मोठ्या संख्येने वार्डातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments