चंद्रपूर जिल्हावासियासाठी आता गोवा साठी सरळ ट्रेन

 

चंद्रपूर जिल्हावासियासाठी आता गोवा साठी सरळ ट्रेन 

🔸बल्लारशाह वासियासाठी गोवा वास्कोडिगामा पर्यत विशेष रेल्वे सुरू

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्हावासियासाठी आनंदाची बातमी आहे आता चंद्रपूर जिल्ह्यावसीयांना गोव्याला जाण्यासाठी मुंबईला जाऊन गोव्याला जायचा खर्च वाचणार आहे.

 विशेष म्हणजे रेल्वे मंत्रालयाने चंद्रपूर जिल्ह्याकरिता विशेषतः बल्लारशाह वासियासाठी गोवा वास्कोडिगामा पर्यत विशेष रेल्वे सुरू करून एक भेट दिली आहे २८ सप्टेंबरला सुरू होऊन ०६३९८ जस्सीडिह-गोंदिया-बल्लारशाह-वास्कोडिगामा ट्रेन आज बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आल्यानंतर ZRUCC सदस्य मध्य रेल्वे मुंबई, श्रीकांत उपाध्याय, प्रभूदास तांड्रॉ मौला निषाद, ई नी ट्रेन चे लोको पायलट संपत व सूरज कुमार याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आठवड्यातून एकदा धावणारी ही गोवा स्पेशल रेल्वे झारखंड च्या जस्सीडिड जंक्शन पासून सुरू होऊन राऊरकेला, बिलासपूर, रायपूर, गोंदिया, बल्लारशाह,  मंचेरियल, काजीपेठ, सिकंदराबाद, रायचूर ई स्थानकावरून वास्कोडिगामा(गोव्याला) पोहोचेल सदर रेल्वे ही वेळापत्रकानुसार दर मंगळवार ला दुपारी १२:५० ला आगमन तर १२:५५ ला प्रस्थान होईल. सद्यस्थिती आठवड्यातून एक दिवस धावणारी रेल्वे ही निकट भविष्यात फेऱ्या वाढविण्यात येईल असे सूत्राकडून माहिती प्राप्त झाली आहे.





Post a Comment

0 Comments