50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक, चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार
◾वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी लिपिकाने मागितली 50 हजार रुपयांची लाच
◾लाचलुचपत विभागाने केली सलीम शेख याला रंगेहात लिपिकाला अटक
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडीने खळबळ माजली आहे यासंदर्भातील माहितीनुसार एका व्यक्तीला आवश्यक कार्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज होती मात्र संबंधित लिपिकाने यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली मात्र त्या व्यक्तीला यासाठी लाच द्यायची नसल्याने त्याने याविषयी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लिपिक सलीम शेख याला रंगेहात अटक केली आहे. या घटनेतील फिर्यादी हे सिंदेवाही तालुक्यातील असून त्यांच्या वडिलांचा वैद्यकीय फॉर्म भरून त्यावर वैद्यकीय अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीकरिता संबंधित लिपिकाने 50 हजार रुपयांची लाच मागितली मात्र फिर्यादी ला लाच द्यायची नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केल्यावर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून आज 28 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी हे वरिष्ठ सहायक, नेत्रशल्यचिकित्सा शास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जि. चंद्रपूर येथे कार्यरत आहेत सदर कारवाई श्रीमती रश्मी नांदेडकर, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर, श्री. मिलिंद तोतरे, अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश भामरे पोलीस उपअधीक्षक, शिल्पा भरडे, पोलीस निरीक्षक, रमेश दुपारे, मनोहर एकोणकर, संतोष येलपुलवार, अजय बागेसर, रोशन चांदेकर, संदेश वाघमारे, रवी ढेंगले, नरेश ननावरे, सतिश शिडाम, समीक्षा भोंगळे सर्व लाचलुचपत विभाग चंद्रपूर यांनी यशस्वीपणे पार पाडली.









0 Comments