ऑटोरिक्षा चालकाची आत्महत्या अवैध सावकार व गटधारकांच्या जाचाला कंटाळून
🔹बल्लारपूर येथील प्रकार
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : मागील दीड वर्षांपासून संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना व त्यातून निर्माण झालेली आर्थिक टंचाई यामुळे जनसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे कोरोना संक्रमनाच्या काळात अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गमवावा लागला होता. मार्च २०२० पासून देशभरात असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र त्या सामान्य नागरिकापर्यंत पोहोचत नाही अशा स्थितीत सामान्य माणूस आर्थिक स्थितीला कंटाळून आत्महत्येचा मार्ग पत्करतात.
अशाच प्रकारची आत्महत्येची दुर्दैवी घटना बल्लारपूर शहरात घडली सूत्राच्या माहितीनुसार काल ३१ जुलैला सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास सुशांत उर्फ बाळू भिमराव झाडे, वय-४५ वर्ष रा.विद्यानगर वॉर्ड बल्लारपूर यांनी आपल्या राहते घरी अवैध सावकारी, फायनान्स व बचतगट यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे वृत्त आहे व्यवसायाने ऑटोरिक्षा चालक असलेले बाळू झाडे यांनी बचत गट व फायनान्स च्या माध्यमातून ऑटोरिक्षा घेतला मात्र सद्यस्थितीचा विचार करता व वाढत्या पेट्रोल-डिजलच्या किंमती वरून ऑटोरिक्षा चालविणे अवघड बनत चालले आहे तसेच दिवसभर ऑटोरिक्षा चालवून केवळ १०० - २०० रु कमवित असत अशातच पेट्रोल-डिजल गाडीत किती टाकायचे व घरी किती पैसे न्यायचे अशा स्थितीत बचत गट व फायनान्स चे कर्मचारी सारखे कर्जवसुली साठी तगादा लावायचे शिवाय केंद्र व राज्य शासनाने घोषित केलेले अनुदान ही वेळेवर मिळत नाही यामुळे सामान्य माणसानं घर चालवायचे की बचतगट व फायनान्स चे हफ्ते भरायचे अशा या द्विधा स्थितीत असल्यामुळे बाळू झाडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे वृत्त आहे एकूणच या आत्महत्येस बचतगट, अवैध सावकार, व फायनान्स कम्पनी जबाबदारआहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. मात्र अशा आत्महत्या प्रकरणामुळे निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागतो एकूणच बाळू झाडे यांच्या आत्महत्या प्रकरणात बचतगट, अवैध सावकारी व फायनान्स जबाबदार आहे की काय हा तपासाचा भाग आहे या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे या दुर्दैवी घटनेची माहिती बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना माहिती होताच त्यांनी सानुग्रह मदत म्हणून दहा हजार रु ची मदत केल्याचे वृत्त आहे.
0 Comments