चोपडा येथील महावीर पतपेढीत प्रकरणी मुख्य आरोपी शोभा शांखला यांच्या सह दोन्ही आरोपींना १४ दिवसासाठी तुरुंगवास.....!
जळगांव/चोपडा (राज्य रिपोर्टर) : चोपडा शहरातील महावीर पतपेढीत कर्ज खात्यात न भरता परस्पर केला १ लाख ८ हजार ३४२ रुपयांचा अपहार प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला ता. २३ सप्टेंबर २०२० रोजी नरेंद्र जैन व प्रविण जैन, माजी व्यवस्थापक शोभ शाखला, यांच्या विरुद्ध व्यवस्थापक अचल अग्रवाल यांनी गुन्हा दाखल केला होता. या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी नरेंद्र चंपालाल जैन (५३) व पिग्मी एजंट व लिपिक प्रविण जैन इंदरचंद जैन, (४५) (दोन्ही रा. गणेश काँलनी,चोपडा) हे ता. १० रोजी शहर पोलीसात स्वत:हुन हजार झाले असता त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना ता. ११ में रोजी तिन्ही आरोपींना ता. २८ में पर्यंत न्यायलिन कोठडी सुनावण्यात आली आहे.





0 Comments