उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या प्रकृतीची माहिती कुटुंबियांना देण्यात यावी - आ. किशोर जोरगेवार
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना सुचना
चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता उपचार घेत असलेल्या रुग्णांजवळ नातलगांना जाण्याची परवाणगी नाही. त्यामूळे उपचारा दरम्याण रुग्णांचा कुटुंबींयाशी संपर्क होत नाही. अशात दर 12 तासांनी रुग्णाच्या प्रकृती बाबतची माहिती त्यांच्या नातगलांना उपलब्ध करुन देण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या आहे.
कोरोणाच्या परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी भेट घेत सदर सुचना केल्या आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. रुग्णाला पूर्णपणे बरे होण्यासाठी जवळपास 10 ते 14 दिवसांचा कालावधी लागत आहे. या दरम्याण रुग्णाजवळ कुटुंबातील कोणताही सदस्य राहत नसल्याने रुग्णाच्या प्रकृती बाबत त्याला योग्य माहिती मिळविणे कठीण होत आहे. अशात रुग्णाच्या प्रकृती गंभिर झाल्यास तात्काळ दुसरे रुग्णालय शोधण्यासाठीही त्यांची धावपळ होत आहे. ही बाब लक्षात घेता शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या प्रकृतीची, ऑक्सिजन पातळीची, हार्ट रेट, रक्तदाब, शुगर प्रमाण, व सुरु असलेले उपचार तसेच इतर महत्वाची माहिती दर 12 तासांनी रुग्णांच्या कुटुंबींयाना देणे बाध्य करण्यात यावे अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत. असे झाल्यास परिवाराला अतिरिक्त होत असलेली चिंता कमी होईल आणि रुग्ण औषधोपचाराला कशी प्रतिक्रिया देत आहे हे त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येईल असेही आ. जोरगेवार यांनी म्हटले आहे.




0 Comments