जीएनपीएस स्कूल व जेसीआई बल्लारपुर वुड सिटी द्वारा आइसोलेशन सेंटर ची शुरुवात

 

जीएनपीएस स्कूल व जेसीआई बल्लारपुर वुड सिटी द्वारा आइसोलेशन सेंटर ची शुरुवात

✳️आमडी ग्राम येथे कोविड 19 आयसोलेशन सेंटर ला सुरू करण्यात आली।

बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : गुरुनानक पब्लिक स्कूल , बल्लारपूर, JCI बल्लारपूर वूड सिटी व सरकारी यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आमडी ग्राम येथे कोविड 19 आयसोलेशन सेंटर ला सुरू करण्यात आली।

बल्लारपूर येथील गुरुनानक पब्लिक स्कूल चे संचालक कैलास खंडेलवाल यांनी या कोरोना संकटात आपली सामाजिक बांधिलकी जोपासत व ग्रामीण भागातील कोरोना बाधित लोकां साठी आमडी येथील आपल्या जागेला आयसोलेशन सेंटर मध्ये रूपांतर करून शासनाच्या स्वाधीन केले, या कामात JCI बल्लारपूर वूड सिटी क्लब तर्फे आपले योगदान देऊन सहकार्य करण्यात आले, JCI क्लब चे अध्यक्ष सुनील जैन यांनी  ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांसाठी हे आयसोलेशन सेंटर फार महत्त्वाचे ठरणार असल्याची भावना व्यक्त केली. 

ग्रामीण भागात आयसोलेशन सेंटर नसल्याने ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना जिल्याच्या ठिकाणी पाठवले जात होते, त्या मुळे ग्रामस्थ टेस्ट करायला घाबरत होते , म्हणूनच ग्रामीण भागात कैलास खंडेलवाल व JCI क्लब तर्फे सुरू करण्यात आलेल्या या कामगिरीची  ची सर्व स्तरावर प्रसंशा करण्यात येत आहे.

या आयसोलेशन सेंटर चा उद्घाटन सोहळा काल आमडी ग्राम येते पार पडला, कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली, यावेळी बल्लारपूर चे SDO संजय ढवले हे प्रामुख्याने उपस्थित होते, तसेच बल्लारपूर चे तहसीलदार संजय राईनचवार, डॉ. गजानन मेश्राम, डॉ. अतुल कोहपरे, डॉ. प्रवीण धाडसे,जेसीआई चे पदाधिकारी संजय गुप्ता आदी ने आपली मते युंक्त केली व गुरुनानक पब्लिक स्कूल व JCI बल्लारपूर चे या योगदाना अशी भावना व्यक्त केली.अनूप कुटेमाटे,दिलीप साह,विनोद कोपरकर,सुनील बोप्पनवार,रवि फूलजले,मदन गुप्ता,नंदू मालु, प्रकाश दोतपेल्ली, तेजिंदर दारी,गोपाल खंडेलवाल,गौरव खंडेलवाल आदि उपस्थित होते।

Post a Comment

0 Comments