कोवीड १९ चे नियम नुसार संचारबंदी व जमावबंदीचे नियम धाब्यावर,,रामपुरा भिल्ल वाडा परिसरात रात्री संशयास्पद व्यक्त कडुन दगडफेक.....!

 

कोवीड १९ चे नियम नुसार संचारबंदी व जमावबंदीचे नियम धाब्यावर,,रामपुरा भिल्ल वाडा परिसरात रात्री संशयास्पद व्यक्त कडुन दगडफेक.....! 

चोपडा शहरातील आदिवासी भागातील

चोपडा( राज्य रिपोर्टर) : भिल्ल वाडा परिसरातील घरावर दगड फेक मागील दोन ते तीन हप्त्यापासुन सुरु आहे. कोणी तरी संशयास्पद व्यक्तीकडून दगड फेक करतो अशी माहिती स्थानिक लोकांकडुन मिळाली. आज देखील संशयास्पद व्यक्तीने रात्री १० ते १०:३० वाजेच्या सुमारास लाईट गेलेली असतांना वेळ साधुन संशयास्पद व्यक्तीने परत दगड फेक करून फराळ झाला. त्यामुळे स्थानिक लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच. विनाकारण दोन गटा मध्ये हाणामारीला सुरूवात झाली. मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली,जोरदार आक्रोश निर्माण होऊन दंगलीचे वातावरण निर्माण झाले. जिवित हाणी होण्याची दाट शक्यता होती.मात्र ही भीती पत्रकार यांना कळताच त्यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पी.आय.औतारसिंग चव्हाण यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला .त्यांना संपुर्ण घटने विषयी माहिती सांगितले. तेव्हा लगेच पी.आय.औतारसिंग चव्हाण यांनी घटना स्थळी पोलीस कर्मचारी (टिम) पाठवली. जमावास नियंत्रण आणण्यासाठी दोन ते तीन तास लागले .तरी देखील परिस्थिती नियंत्रणा बाहेर होऊ लागली. पोलीसाची संख्या कमी पडू लागल्यामुळे त्वरित आर. सी. पी. चे जवान बोलविण्यात आले. संपुर्ण रामपुरा भिल्ल वाडा भागात कफ्यु लावण्यात आला. घटना स्थळी पोलीस व आर .सी .पी .चे जवान यांच्यामार्फत कडक कर्फ्यु काल रात्री पासुन ते आज पर्यंत करण्यात आले. जमावास नियंत्रण आणण्यास पोलीस व आर. सी.पी.चे जवानांना यश आले. पोलीसानी व आर.सी.पी.च्या जवानांनी घेतलेल्या कठोर मेहनतीमुळे रामपुरा भागातील लोकांनमध्ये परत शांततेचे वातावरण निर्माण झाले.आता थोडेफार शांततेचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक लोकांनी पोलीसांचे व जवानांचे आभार व्यक्त केले..



Post a Comment

0 Comments