लासूर व हातेड पाठोपाठ चहार्डी येथील १२बेड साठी ऑक्सिजन पाईप लाईन चे काम लोकसहभागातून पूर्ण.

 

लासूर व हातेड पाठोपाठ चहार्डी येथील १२बेड साठी ऑक्सिजन पाईप लाईन चे काम  लोकसहभागातून पूर्ण.

जळगांव/चोपडा (राज्य रिपोर्टर) : भावांनो तहान लागल्यावर विहीर खोदण्याचे काम करण्यापेक्षा आधीच तयारी करावी यासाठी आपण प्रार्थमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी १२ बेड तयार करीत आहोत.आज तिसऱ्या केंद्रातील बेड चे काम पूर्ण झाले.उद्या तालुक्यातील मान्यवर मा.तहसीलदार अनिल गावित, बी डी ओ कोसोदे   साहेब,डॉ. मनोज दादा डॉ. लसुरकरयांचे समक्ष सकाळी १०:०० वाजता तेथील चाचणी घेण्यात येणार आहे.गावातील सारे मान्यवरांना विनंती आपण प्रत्यक्ष भेट देवून काही सूचना असतील तर कराव्यात.

लहान हातेड येथील ग्रामस्थांनी लाखाचे वर जमा केले तर मोठी हातेड येथील सज्जनांनी पन्नास हजार  चे वर जमा केलेत. त्यामुळे तेथील काम त्यांचेच निधीतून पूर्ण झाले.अतिशय कौतुकास्पद काम तेथील ग्रामस्थांनी केले तर लासूर येथे देखील श्री ए के गंभीर सर व अनिल वाघ सर अजून मदत गोळा करीत आहेत.खूप खूप आभार.

अश्या पद्घतीने प्रत्येकाने आपल्या गावाचा भार उचलला तर तो निधी पुढे वापरता येईल.अन्यथा आमच्या कडे जसा निधी जमा होत आहे त्यानुसार उर्वरित कामे केली जातील.

  आज ऑक्सिजन प्लांट ला प्रांत अधिकारी सौ. सीमा ताई अहिरे व प्रांत अधिकारी सुमित शिंदे यांनी भेट देवून समाधान व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments