अरेरावी करणार्‍या कर्मचार्‍यांना उपविभागीय अधिकाऱ्यांचा दणका

 

अरेरावी करणार्‍या कर्मचार्‍यांना उपविभागीय अधिकाऱ्यांचा दणका

सामान्य माणसाला जरी कुणी धमकी दिली तर तो FIR करतो.  मग दंडाधिकाऱ्याला धमकी दिली तर त्याने मूग गिळून बसायचं का?

बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) :  कोरोना परिस्थिती सध्या भयावह झाली आहे.  आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासन, आरोग्य विभाग,पोलिस विभाग झपाटून काम करत आहेत. मात्र काही कर्मचारी कामचुकारपणा करत आहेत. काम करण्यास नकार देत आहेत. अशीच एक घटना बल्लारपूर मध्ये घडली.कोरोना संबंधी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ची  माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांना विचारून दररोज नायब तहसीलदार यांना सादर करण्याचे काम उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने कर्मचारी सुनील चांदेवार याच्या वाट्याला आले होते. मात्र संघटनेचा पदाधिकारी असल्याच गुमान असलेला सुनील चांदेवारने ते काम करण्यास नकार दिला. वर तर अधिकाऱ्यांनाच तुम्ही माझ्यावर कारवाई करून तर बघा मी तुम्हाला बघून घेतो. अशी धमकी देऊन निघून गेला. सीसीटीव्ही फुटेज पाहताच या मस्तवाल सुनील चांदेवार ची धमकी देणारी भाषा लगेच लक्षात येते.

 त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी कोरोना कामास नकार आणि धमकी दिली म्हणून कारवाईचे पत्र तयार करण्यासाठी नायब तहसीलदार यांना सांगितले. मात्र तासाभरात, दक्षिणात्य सिनेमाला लाजवेल अशा पद्धतीने,गाड्यांमध्ये खचाखच भरून जिल्हाधिकारी कार्यालयातील काही करणारे कर्मचारी नेते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले.सध्या लॉकडाउन आहे. कलम 144 लागू आहे.बाहेर पडल तरी पोलिस टणकवतात.कोरोना नियमात पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास सक्त मनाई आहे.मात्र शासकीय सेवक असलेल्या 19 जणांच्या टोळक्यांनी, जणू मारायला आलेत अशा अविर्भावात उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश केला.

उपविभागीय अधिकारी यांनी त्यांना सक्त सूचना दिली होती की, फक्त पाच लोकांनी यायचं.असे असूनही त्यातला एक शैलेश धात्रक म्हणाला की,"या, काय होत नाही. आपण जिल्हाधिकारी कार्यालयातील आहोत.बघून घेऊ काय करतो हा एसडीओ". आणि एसडीम च्या आदेशाचा भंग करून दहा लोक दालनात घुसले. 

त्यानंतर एक व्यक्ती राजू धांडे म्हणाला " आम्ही म्हैसेकर साहेबांना जिल्हाधिकारी पदावरून पायउतार होताना सेंड ऑफ दिला नाही तर त्याची चर्चा महाराष्ट्रभर झाली त्यामुळे त्यांची फार बदनामी झाली.जर तुम्ही कारवाई केली तर आम्ही तुमची बदनामी करू. म्हैसेकर साहेबां सारखे पुण्याचे विभागीय आयुक्त राहिलेले,अत्यंत शांत संयमाने पूर्ण पुणे विभाग कोरोना च्या पहिल्या लाटेमध्ये समर्थ नेतृत्व देऊन सांभाळणारे,आणि आता निवृत्त झाल्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहत असलेल्या IAS माणसाविषयी अशा उद्दाम पणे बोलणारा माजोरा एवढे बोलून थांबला नाही तर पुढे म्हणाला,तुम्ही फार दुरू वरून इथे नोकरी करण्यासाठी आलाय.इथे तुमचं कुणी नातेवाईक नाही.इथे फक्त आम्हीच आहोत. जर तुम्ही आमच्या विरोधात गेला आणि FIR केला तर आम्ही तुमच्या मागे लागू. जशी गत तुमच्या गोंडपिंपरी च्या आधीच्या तहसीलदार सीमा गजभिये यांची झाली होती, त्यांचा आम्ही मागे लागलो तर त्यांच्या एवढ्या तक्रारी केल्या की त्यांना त्यांची बदली नागपूरला करून घेण्याची वेळ आली. त्यामुळे FIR न करण्यातचं तुमचं भलं आहे. धांडे म्हणाला की जर तुम्ही कारवाई केली तर आम्ही जिल्हा बंद करू, राज्य बंद करू. असे म्हणून कोरोना संक्रमण काळात शासकीय कार्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी यांना कामकाज चालवायचे असते.आजपर्यंतचा इतिहास आहे की जिल्हाधिकारी यांनी आमचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. त्यामुळे ते तुमच्यावरच कारवाई करतील.तुम्हाला निलंबित करतील किंवा सक्तीच्या रजेवर पाठवतील. जर तुम्ही गुन्हा दाखल केला तर आम्ही पण महिलांमार्फत किंवा Attrocity  चा गुन्हा तुमच्यावर दाखल करू.त्यामुळे FIR न करण्यातच तुमचं भलं आहे. अशी धमकी देऊन हे व्यक्ती निघून गेले. आणि त्यानंतर त्यांनी एक निवेदन बनवलं आणि त्यावर पटापट सह्या घेतल्या आणि जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्याआधीच रातोरात व्हायरल केलं. एमपीएससी परीक्षा राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच चारित्र्य हनन केलं. त्याच्या वर घाणेरडे आरोप लावण्यात आले.जे तद्दन खोटे आणि हास्यास्पद आहेत. 

एसडीएम संजय ढवळे मागील दोन वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारपूर आणि गोंडपिपरी या दोन उपविभागाचे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.तसेच ते पोंभुरणा आणि गोंडपीपरी ह्या दोन नगर पालिकेचे प्रशासक सुद्धा आहेत. त्यांच्याकडे एकूण चार कार्यालय आणि तीन तहसील कार्यालय अशी एकूण सात कार्यालये आहेत. त्यामध्ये शेकडो कर्मचारी, तलाठी, कोतवाल,पोलीस पाटील आहेत.मात्र मागील दोन वर्षात एकाही कर्मचाऱ्यावर त्यांनी कारवाई केली नाही.त्यांच्या विरोधात  दोन वर्षांमध्ये संघटनेमार्फत एकही निवेदन देण्यात आले नाही. मात्र जेव्हा कोरोना कामात कामचोर पदाधिकाऱ्यावर कारवाई होणार तेव्हा संजय डव्हळे ला रातोरात चुकीचं ठरवल्या जाते. त्यांचे चारित्र्यहनन केलं जातं. ते व्हायरल केले जात. फक्त कारवाई होऊ नये म्हणून दबाव तयार करण्यासाठी, संघटनेचे पदाधिकारी असे घाणेरडं वागणार असतील तर अशा संघटनेचा नेता म्हणून मिरवणाऱ्या राजू धांडे, शैलेश धात्रक व संघटनेच्या इतर पदाधिकारीना तात्काळ अटक होऊन शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्यानंतर प्रश्न असा आहे की एवढी गुर्मी, एवढी मस्ती,या नेते कर्मचाऱ्याकडे येते कुठून??? उपविभागीय दंडाधिकारी यांच्या दालनात झुंडीने घूसून,त्यांना धमकावण्याची हिम्मत या नेते कर्मचाऱ्यांमध्ये येते कुठून ???

या असल्या दाक्षिणात्य स्वरूपात येणाऱ्या कामगारांना नोकरीतून काढायला पाहिजे.ज्या तिघांवर गुन्हा दाखल केला यांना तात्काळ अटक करायला पाहिजे.आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांना निलंबित करून सेवेतून काढून टाकायला पाहिजे.

सामान्य माणसाला जरी कुणी धमकी दिली तर तो FIR करतो.  मग दंडाधिकाऱ्याला धमकी दिली तर त्याने मूग गिळून बसायचं का? अधिकारी एकटा आहे म्हणून त्यांने संख्येने जास्त असणाऱ्या,झुंडीने येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अन्याय सहन करायचा का??? हा प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारत आहे. उपविभागीय अधिकाऱ्यानी दिलेल्या दणक्याने मात्र यापुढे अशी हिम्मत कोणी करणार नाही. या संघटित गुन्हेगारी विरोधात केलेल्या धडक कारवाईमुळे जिगरबाज एसडीएम संजय ढवळे यांची महाराष्ट्र भर चर्चा सुरू आहे.

Post a Comment

0 Comments