पोंभुरणा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची अवैध दारू तस्कराच्या विरुध्द कारवाई
चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : पोलीस स्टेशन पोंभुरणा अंतर्गत मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब खाडे यांना मिळाली असता त्यांनी एक विशेष पथक स्थापन करून त्यांना योग्य त्या प्रकारच्या सूचना देऊन 26 मे 2021 ला रवाना केले सदर पथक पोंभुरणा परिसरात जाऊन गोपनीय सूत्राच्या माहितीच्या आधारावरून शेख जब्बार नावाचा इसम पोंभुरणा ते कसरगट्टा रोडलगत असलेल्या शेतात देशी-विदेशी दारूचा साठा करून ठेवला असल्याच्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखांच्या पथकाने सापळा रचून शेख जब्बार यांच्या शेतात छापा टाकला असता संशयित शेख जब्बार हा पोलिसांना पाहून जंगलाच्या दिशेने पळून गेला त्या ठिकाणी पोलीस पथकाला 30 पेटी देशी दारू व 3 पेटी विदेशी दारू व 1 मोपेड गाडी असा दारू साठा व वाहन असा एकूण 3,93,200 रु चा दारुसाठा पोलिसांनी जप्त करून आरोपी नामे शेख जब्बार शेख गुलाब रा. पोंभुरणा यांचे विरुध्द अप क्र 61/2021 कलम 65(ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब खाडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर सचिन गदादे, पोउनी, अहमद खान, गजानन नागरे, अविनाश दशमवर, प्रशांत नागोसे, रवींद्र पंधरे, नरेश डाहुले यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे. विशेष बाब म्हणजे जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू तस्करी होत असताना पोलीस विभागाच्या कारवाई वर अनेक प्रश्न निर्माण होत आहे स्थानिक गुन्हे शाखा एखाद्या पोलीस स्टेशन अंतर्गत दारू तस्करीवर कारवाई करते स्थानिक पोलीस स्टेशन फक्त मृग गिळून मुकदर्शक तर बनण्याचे काम करीत नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहे.
0 Comments