प्रकृती महिला विकास संस्था व ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर तर्फे मदतकक्ष व संपर्कसेतु नागरिकांच्या सेवेकरिता सुरू.

 

प्रकृती महिला विकास संस्था व ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर तर्फे मदतकक्ष व संपर्कसेतु नागरिकांच्या सेवेकरिता सुरू.

🔹रुग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांना होणारा त्रास दुर होऊन या मदत कक्षामुळे योग्य वेळी त्वरित उपचार मिळेल - नगराध्यक्ष श्री.हरीश शर्मा

बल्लारपूर (राज्य रिपोर्टर) : प्रकृती महिला विकास संस्था व ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर तर्फे कोरोना संसर्गाचा वाढता प्रकोप व रूग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य माहीती मिळत नसल्याने होणारा त्रास बघता  मदत कक्ष व संपर्कसेतुची सूरुवात नगराध्यक्ष श्री.हरीशजी शर्मा यांच्या हस्ते  करण्यात आले.या मदत कक्षाचे नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास त्याचे निदान व योग्य उपचारा संबधी मार्गदर्शन तसेच इतर आरोग्य संबधी माहीती मिळेल.

तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना,जननी शिशु सुरक्षा योजना,व ग्रामिण रुग्णालयातील सुविधां विषयी लाभ घेण्यासाठी योग्य सल्ला व मार्गदर्शन या माध्यमातुन केला जाईल.

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती डॉक्टर वावरकर मॅडम जागृती महिला मंचच्या  संध्याताई एदलाबादकर प्रकृती महिला मंडळाचे अध्यक्ष निलेश देवतळे व ज्युनियर डॉक्टर्स तथा मेडिकल स्टाफ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments