सानेगुरुजी वसाहत भागातील वारंवार होणाऱ्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण...!

 

सानेगुरुजी वसाहत भागातील वारंवार होणाऱ्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण...! 

जळगांव/चोपडा(राज्य रिपोर्टर) : चोपडा शहरा लगत असलेल्या सानेगुरुजी वसाहत/नगर भागातील विद्युत रोहित्रावर वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे शहर वासियांना खंडीत वीज पुरवठा होत. असल्याने रात्र बेरात्री हाल सहन करावे लागत आहे. यामुळे शहरामध्ये चोरीचे व घरफोड्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरातील सानेगुरुजी वसाहत /नगर भागातील महावितरणच्या १३२ केव्हाी वरुन लासुरला वळवण्यात आलेली वीज उच्चदाब वाहिनीच्या विद्युत वाहिनी गेल्यामुळे शहरवासीयांना यामुळे फार मोठा धोका निर्माण झाला आहे. याच भागात गेल्या वर्षापुर्वी विद्युत वाहिकेच्या स्पर्श झाल्याने ओम नावाचा मुलगा जागीच मृत्यू पावला होता. तरी देखील महावितरण कंपनीने या संदर्भात काहीही हालचाली केले दिसत नाही. अनेकदा अर्ज विनंत्या करुन संबंधित अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहे. महावितरणाने या विद्युत वाहक व रोहित्र नागरिकाच्या वस्तीपासून दुसऱ्या कोणत्याही भागातुन हलवावी अशी मागणी सानेगुरुजी वसाहत/नगर भागातील रहिवासी करत आहे. 




Post a Comment

0 Comments