वर्धा नदीत बुडून एकाचा मृत्यु

 

वर्धा नदीत बुडून एकाचा मृत्यु 

बल्लारपूर (राज्य रिपोर्टर) : बल्लारपूर शहरातील गणपती विसर्जन घाटावर काल सायंकाळी 9:00 वाजताच्या दरम्यान एका व्यक्तीने आत्महत्या केली असल्याचे वृत्त प्राप्त झाले होते मात्र त्या वृत्ताला दुजोरा मिळाला नव्हता मात्र आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार बल्लारपूर शहरातील महात्मा गांधी वॉर्ड निवासी असलेले विलास पारधी यांचा मुलगा बल्लारपूर येथील वर्धा नदीत बुडाला असल्याचे वृत्त मिळताच अनेकांनी वर्धा नदीच्या गणपती विसर्जन घाटावर गर्दी केली होतो.

 मिळालेल्या माहितीनुसार कौशिक विलास पारधी वय - 22 वर्ष हा काल सायंकाळी 8:00 वाजताच्या दरम्यान आपल्या दुचाकी सह नदीवर आला होता त्याची दुचाकी  वर्धा नदीच्या संपवेल घाटावर व दुचाकींची चाबी नदीच्या तिरावर असल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शीनी सांगितले या बाबी वरून बल्लारपूर पोलिसांना माहिती दिली असता त्यांनी वर्धा नदीत बोटीच्या साहायाने पाहणी केली असता दुपारी 1:00 वा च्या दरम्यान मृतदेह मिळाला सदर मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे आणण्यात आला असून नेमकं कोणत्या कारणामुळे सदर मुलाने आत्महत्या केली हे अजून कळू शकले नाही या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments