बल्लारपूरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याची केली अँटीजेन टेस्ट
🔹88 पैकी 05 व्यक्ती आढळले कोरोनाबाधित
🔹नगर परिषद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व गोल पूल वस्ती विभाग या 2 ठिकाणी अँटीजेन तपासणी मोहीम राबविण्यात आली
बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना चाप बसावा या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक यांच्या सूचनेनुसार संपूर्ण जिल्हाभरात विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्याची अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे जेणेकरून जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रसारावर निर्बंध आणता येईल .
या उद्देशाने बल्लारपूर नगर परिषद, तहसील कार्यालय बल्लारपूर, पोलीस स्टेशन बल्लारपूर व ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर च्या संयुक्त माध्यमातून बल्लारपूर येथील नगर परिषद परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक व गोल पूल वस्ती विभाग या 2 ठिकाणी अँटीजेन तपासणी मोहीम राबविण्यात आली सकाळी 11 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत एकूण 88 व्यक्तीचे अँटीजेन टेस्ट करण्यात आली यापैकी 05 व्यक्ती कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तसेच सदर अँटीजेन चाचणी यानंतरही सुरू राहणार असल्याचे सूतोवात यावेळी उपस्थित असलेल्या उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर, मा.संजय राईचंवार तहसीलदार बल्लारपूर, मा. विजयकुमार सरनाईक मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, डॉ.गजानन मेश्राम वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर ई च्या सहकार्यातून सदर कोरोना टेस्टिंग मोहीम राबविण्यात आली.





0 Comments