चोपडा उपजिल्हा रुग्णालयात डॉ. मनोज दादा पाटील यांच्या कडे चाळीस( 40 ) fire extinguisher सुपुर्द करण्यात आले...
अपघात झाल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच उपाय योजना केलेल्या बऱ्या....
चोपडा (राज्य रिपोर्टर) : देशभर कोविड रुग्णालयात एकतर ऑक्सिजन गळती किंवा शॉर्ट सर्किट ने आग लागण्याच्या घटना घडत आहेत.ह्याला जबाबदार सध्याची वेळ आहे.कारण ऑक्सिजन जेथून रुग्ण घेतात तेथे देखील रुग्ण बऱ्याच वेळेस स्वतःच्या हाताने कमी अधिक करतात त्यामुळे तेथील वस्तू खराब होऊ शकतात.तसेच जुन्या काळात केलेली विजेची फिटींग असून आता त्यावर पुढे अधिकचा भार दिला जातो व विशेष म्हणजे अतिदक्षता विभागात चोवीस तास सारे एसी चालू आहेत व इतर वॉर्डांत देखील सारे विजेची उपकरणे सध्या सुरू असल्याने साहजिकच तारा गरम होतात व आग लागू शकते.
भावांनो,काही मंडळी कुठे दुर्घटना घडली तर त्यांच्या धोरणांनी टीका करू शकतात,तो आपला प्रांत नाही. दुर्घटना घडू नये यासाठी काळजी घ्यावी लागेल.त्यासाठी ते सारी यंत्रणा वारंवार तपासणे गरजेचे असते ते काम प्रशासन करीत आहेच.तरी देखील आपण काळजी घ्यावी म्हणून चाळीस(४०) Fire extinguishers चोपडा उपजिल्हा रुग्णालयात डॉ मनोज दादा पाटील यां चे कडे सुपूर्द केलेत... .प्रत्येक गोष्ट सर्वांना सुचेल किंवा दिसेल असे नाही,ज्यांना अजून कुठे त्रुटी वाटत असतील तर निश्चित सूचवाव्यात.सरकार कोणत्याही पक्षांचे राहो ते येते व जाते,पण तेथे उपचार घेणारे आपण सारे आहोत. तिसऱ्या लाटेत जास्त रुग्ण येवू शकतात असा जगभर अंदाज वर्तवला जात असताना आपण आता ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करू यात... आपलेच..एस बी नाना पाटील व सारे सहकारी, कोरोनामुकत अभियान,चोपडा




0 Comments