बल्लारपूर नगर परिषदेच्या 200 कंत्राटी सफाई कामगारांचे व कुटुंबियांचे लसीकरण करण्याची मागणी - हरीश शर्मा
🔸रविवार सुट्टी चा दिवस असो की कोणताही सण उत्सव असो नेहमी ते शहराची साफसफाई करतांना दिसून येतात
बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : मागील वर्षभरापासून बल्लारपूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगर परिषदेचे कंत्राटी सफाई कर्मचारी अविरत पणे काम करताना दिसून येतात मग तो रविवार सुट्टी चा दिवस असो की कोणताही सण उत्सव असो नेहमी ते शहराची साफसफाई करतांना दिसून येतात मात्र कोविड च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही अशा कामगारांना सुरक्षा म्हणून उपाययोजना केवळ नावालाच होत्या विशेष बाब म्हणजे नगर परिषद बल्लारपूर अंतर्गत 200 कंत्राटी सफाई कर्मचारी असून मागील वर्षभरापासून कोविडच्या कालावधीत घरोघरी जावून कचरा संकलनाचे कार्य केले अशा परिस्थितीत त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका संभवतो तरी अशा सफाई कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांना विशेष कॅम्प लावून आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाची लस देण्यात यावी अशी मागणी मा.हरीश शर्मा अध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर यांनी राज्याचे माजी वित्त वन व नियोजन मंत्री व अध्यक्ष लोकलेखा समिती आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कडे केली असून लवकरच या मागणीची दखल घ्यावी अशी विनंती ही करण्यात आली.




0 Comments