बल्लारपूर पोलिसांनी कारवा जंगल परिसरात पकडली अवैध दारू 10,61,000/- रु ची मुद्देमाल जप्त
3 विरुध्द गुन्हा दाखल
बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : बल्लारपूर पोलिसांना विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार बल्लारपूर लगतच्या कारवा जंगल परिसरात 2 ते 3 व्यक्ती दारूची विल्हेवाट लावत असल्याची माहिती गुप्त सूत्राकडून प्राप्त झाली असता बल्लारपूर पोलिसांनी सदर ठिकाणी रेड केली असता या ठिकाणी 69 खरड्याचे बॉक्समध्ये देशी दारू रॉकेट संत्रा 69,000 बॉटल मिळाल्या यांची अंदाजित किंमत 10,35,000/- रु तसेच 26,000/- रु किमतीचे तीन मोबाईल फोन असा एकूण 10,61,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला याप्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 1) सिध्दार्थ उर्फ बाप्या रंगारी, 2) नागेश मेश्राम, 3) प्रफुल्ल तामगाडगे सर्व रा. डॉ राजेंद्रप्रसाद वॉर्ड, बल्लारपूर जि. चंद्रपूर यांना अटक करण्यात आली असून याप्रकरणात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व आरोपींना बल्लारपूर पोलीस स्थानकात आणण्यात येऊन त्यांचे विरुध्द पो.स्टे. अप क्र. 531/2021 मदका कलम 65(ई) 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विकास गायकवाड, सपोनि रमीझ मुलाणी, पोउनी चेतन टेंभुणें, पोहवा आनंद परचाके, जीवतोडे, नापोशी सुधाकर वरघणे, शरद कुडे, राकेश, पोशी दिलीप आदे, श्रीनिवास वाभीटकर, शेखर माथनकर, गणेश पुरडकर यांनी केली आहे.
जरी विदर्भातील चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी असली तरी ही दारू बंदी केवळ कागदोपत्री आहे की काय असा प्रश्न आज सामान्य जनता करू लागली आहे जरी देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असला व यानुसार राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत मात्र अवैध दारूची वाहतूक बिनधास्त पणे होत आहे यामुळे प्रशासनाचा खरच अवैध दारू तस्करी वर वचक आहे का असाही प्रश्न निर्माण होत आहे बल्लारपूर शहराचा विचार केला तर शहरातील अनेक भागात अवैध दारू विक्री सुरू असते विशेष बाब म्हणजे दारू तस्कर अनेक नवनवीन क्लुप्त्या लढवून दारूची तस्करी करतांना आढळून येतात जिथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणसाला बाहेर फिरतांना आढळून आल्यास प्रशासन दंड करतो तिथे अवैध दारूची तस्करी खुलेआम पणे होते की काय? मागील काही दिवसांपूर्वी वरोरा, भद्रावती ई ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त करण्यात आली होती.




0 Comments