शोकसंवेदना : माजी पालकमंत्री, माजी राज्यमंत्री, माजी आमदार संजयबाबु देवतळे यांचे अकस्मात आपल्यातून निघून जाणे - आमदार सौ. प्रतिभा धानोरकर

 


शोकसंवेदना :

               माजी पालकमंत्री, माजी राज्यमंत्री, माजी आमदार संजयबाबु देवतळे यांचे अकस्मात आपल्यातून निघून जाणे - आमदार सौ. प्रतिभा धानोरकर

  चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) :              शांत सुस्वभावी, संयमी राजकारणी, साधे सरळ व्यक्तिमत्व, माजी पालकमंत्री, माजी राज्यमंत्री, माजी आमदार संजयबाबु देवतळे यांचे अकस्मात आपल्यातून निघून जाणे हे वरोरा विधानसभा क्षेत्रासाठीच नाही तर राज्यासाठी एक अपिरीमित हानी आहे. राजकारणात अशी सरळमार्गी व साधी माणसं आता फार कमी राहीली आहे.
             मी जेव्हा आमदार म्हणुन निवडू आली, तेव्हा संजयबाबुंचा मला कॉल आला व वरोरा विधानसभेच्या प्रथम महिला आमदार म्हणुन शुभेच्छा दिल्या. तसेच या क्षेत्राच्या लवकरच प्रथम महिला मंत्री व्हाव्या, असा आशीर्वादही दिला. ते शब्द आजही मला भावूक करतात.
             ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो व  त्यांच्या आप्तपरीवारास तथा त्यांच्यावर प्रेम करणा-या तमाम जनतेला दुखा:तून सावरण्याचे बळ मिळो, हिच प्रार्थना.

- आमदार सौ. प्रतिभा धानोरकर
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र,
वरोरा.

Post a Comment

0 Comments