कोरोना महामारीत अपयशी मेडिकल कॉलेजचे डी एन, जिल्हा शल्यचिकित्सक तथा कोविड इन्चार्ज यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे - राजु झोडे
बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना महामारीचा स्फोट झालेला असून सर्वसामान्य माणसाला कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा मिळत नाही आहे. कोविड रुग्णांना उपचार तर सोडा साधा बेडही उपलब्ध होत नाही त्यामुळे कित्येक रुग्णांचे जीवही जात आहेत. जिल्ह्यातले राजकारणी नेतेमंडळीवर मेहेरबान होऊन त्यांच्या जवळच्या रुग्णांनाच बेड व इतर आरोग्य सुविधा दिल्या जात आहे. सर्वसामान्य रुग्णांना बेड उपलब्ध नाही म्हणून परत पाठवल्या जात आहे. बेड व इतर आरोग्य सोयी सुविधा तसेच रेमडेसीवर इंजेक्शन याबद्दल वेबसाईट वर खोटी माहिती टाकून दिशाभूल केली जात आहे. गरजू रुग्णांना रेमडेसिवर इंजेक्शन मिळत नसून जादा दराने विक्री करून काळाबाजार होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून यामुळे कित्येकांचे जात आहे. मेडिकल कॉलेजचे डि एन , जिल्हा शल्य चिकित्सक तसेच कोविड इन्चार्ज यांच्या निष्काळजीपणामुळे रूग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून वरील अधिकारी मनमर्जीने अशा राजकीय नेत्यांच्या हाताचे बाहुले बनून ते म्हणतील त्यांनाच बेड व इतर आरोग्य सुविधा पुरवत आहेत. अशा अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्या जागी नवीन अधिकार्यांची नेमणूक करावी. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता प्रयत्न करावे या मागणी करता वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी जिल्हाधिकारी यांचे मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले.
0 Comments