बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील विलगीकरण रेल्वे गेली कुठे ?
🔆19 डब्याची विलगीकरण रेल्वे बल्लारशाह रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर दाखल झाली होती
🔆विलगिकरणाच्या एका डब्यात एका वेळेस जवळपास 100 व्यक्ती विलगिकरणात राहण्याची सोय होती
बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : 2020 मध्ये देशभरात कोरोना विषाणूजन्य आजार धुमाकूळ घालत असतांना नागरिकांच्या विलगिकरणाची व्यवस्था व्हावी या दृष्टीने मध्य रेल्वेच्या वतीने 19 डब्याची विलगीकरण रेल्वे बल्लारशाह रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर दाखल झाली होती व काही दिवस रेल्वे स्थानकावर उभी होती मात्र या दरम्यान कोरोनाच्या रुग्णांची व्यवस्था इतरत्र झाल्यामुळे ती रेल्वे निघून गेली मात्र सद्यस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात कोरोना धुमाकूळ घालत असतांना तसेच बेड अभावी व उपचाराअभावी रुग्ण दगावत असतांना खरी गरज आज असतांना विलगीकरण रेल्वे गेली कुठे असा प्रश्न आज सामान्य नागरिक करीत आहे.
विलगिकरणाच्या एका डब्यात एका वेळेस जवळपास 100 व्यक्ती विलगिकरणात राहण्याची सोय होती 19 डब्याची विलगीकरण रेल्वे नागपूर, चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वे स्थानकावर कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी उपयोगात आणता आली असती कोरोनाच्या पहिल्या लाटेत आयसोलेशन रेल्वे चा उपयोग झाला नाही मात्र सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट आली असून जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण असल्याचे दिसून येत आहे कोरोना रुग्णाला बेड मिळणे अवघड झाल्याचे दिसत आहे अशात अनेक रुग्ण उपचारासाठी लगतच्या तेलंगाना, आंध्रप्रदेश राज्यात जात आहे अशा परिस्थितीत विविध माध्यमांनी सुसज्ज असलेली विलगीकरण रेल्वे कोरोनाग्रस्त रुग्णाच्या उपचारासाठी उपयोगात आली असती तरी राज्यातील व जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रसाराची स्थिती पाहून सद्यस्थितीत तरी मध्य रेल्वेने पुनर्विचार करून तरी विलगीकरण रेल्वे बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आणण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहे.





0 Comments