मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी कोरोनामुळे निधन.
चोपडा (राज्य रिपोर्टर) : जगदीश लाडने अतिशय कमी वयात बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्याने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता.
महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास ४ वेळा सुवर्णपदकाची कमाई केली होती. एवढंच नव्हे तर मिस्टर इंडिया स्पर्धेत २ वेळा सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. तसंच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलं होतं. जगदीश लाड हा फीट असुन, रोगप्रतिकारक शक्ति चांगली असुन सुदधा कमी वयात आपल्याला सोडून गेला. त्यामुळे मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका. काळजी घ्या विनाकारण बाहेर पडू नका ....





0 Comments