राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे ग्राम पंचायत निवडणूक महिला उमेदवाराचे धाडस
यवतमाळ/राळेगाव(राज्य रिपोर्टर): जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उध्दारी अशी एक समर्पक व प्रसिद्ध म्हण आहे.याचाच प्रत्यय यावा अशी एक घटना ग्राम पंचायत निवडणूक निमित्ताने राळेगाव तालुक्यातील वाढोणा (बा.)येथे पहायला मिळाली.रुपाली नामक दोन महिन्याच्या बाळानंतीन महिलेने निवडणूकीच्या मैदानात उडी घेतली.महिलाही सक्षम पणे कोणत्याही स्तिथीत लढू शकतात हा परिचय या महिलेच्या उमेदवारी निमित्ताने दृगोचर होतांना दिसत आहे.
रुपाली ही सुशिक्षित आहे पदवी पर्यंतचे शिक्षण तीने घेतले. राज्यातील आदर्श गावे पाहून आपलेही गाव तसे व्हावे या भावनेतून ती राजकारणाच्या क्षेत्रात उतरली आहे.
निवडणुकीचा रिगणात सहभाग घेतला आहै या वर्षा संधी मिळाली नाहि तर पुन्हा पाच वर्ष थाबावे लागेल आणी गावाचा विकास हाच ऊदेश रूपाली कन्नाके डोळ्या समोर ठेवला आहै
" महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे ध्येय"
शासनाच्या विविध योजना असतात महिलांची आथीक ऊन्नती व्हावी यासाठी शासण सर्वतोपरी प्रयन्त करते माञ या योजनांचा लाभ गावातिल महिलांना मिळू शकत नाही.त्यामुळे त्याची प्रगती खुंटली आहे. तसेच अनेक योजना असून देखील गावात त्या राबवल्या जात नाही.म्हनुनच गावाचा विकास व्हावा , गाव समूध्द व्हावे ,गाव आदर्श निर्माण व्हावे यासाठी निवडणुकीच्या रिगणात ऊतरल्याची प्रतीकिया रूपाली यांनी दिली.




0 Comments