महाराष्ट्रात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अजब गजब चिन्ह : 40 चिन्हांची वाढ, 190 चिन्हाचा पर्याय उपलब्ध

 


महाराष्ट्रात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अजब गजब चिन्ह : 40 चिन्हांची वाढ, 190 चिन्हाचा पर्याय उपलब्ध       



चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : महाराष्ट्रात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने अजब गजब चिन्ह उपलब्ध करून दिली आहे.

 एक प्रकारची भाजी मंडईच भरली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे जवळपास 10 प्रकारच्या फळभाज्या व 9 विविध प्रकारची फळे आहे विशेष बाब म्हणजे फळभाज्या अंतर्गत ढोबळी मिरची, फुलगोबी, आले, हिरवी मिरची, भेंडी, मक्का, भुईमुंग, वटाने ई प्रकारच्या फळभाज्या तर  सफरचंद, नारळ, द्राक्ष, फणस, पेरू, अननस, कलिंगड व अक्रोड ई प्रकारची फळे आहेत या शिवाय ब्रेकफास्टचे बिस्कीट, पाव, केक आणि व्हेज थाळीचाही समावेश आहे तसेच आईस्क्रीम, पेनड्राईव्ह, टीव्ही रिमोट, आधुनिक क्रेन सह तब्बल 190 निवडणूक चिन्हाचा यादीच निवडणूक आयोगाच्या वतीने जारी करणयात आली आहे. राज्यभरात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत असतांना 4 जानेवारी रोजी उमेदवारी माघारीनंतर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत अधिकांश ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी अनेक वार्डातील उमेदवार एकत्र येऊन पैंनल केले तरी पॅनल मधील सर्व उमेदवारांना वेगवेगळ्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल.

Post a Comment

0 Comments