वीज बिलासंदर्भात महाराष्ट्र सरकार विरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे युवा मोर्चाचे सर्वसामान्य जनतेला व युवकांना आव्हान..



 वीज बिलासंदर्भात महाराष्ट्र सरकार विरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे युवा मोर्चाचे सर्वसामान्य जनतेला व युवकांना आव्हान..

चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : महाराष्ट्राचे लोकनेते मा.आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर यांच्या मार्गदर्शनात तसेच चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष मा.देवरावजी भोंगळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हाभर सोमवार दि.23 नोव्हेंबर 2020 रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोवीड-19 च्या काळात बेकायदेशीररित्या अतिरिक्त दिलेल्या विद्युत बिलाची होळी करण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सर्वसामान्य जनतेच्या उपस्थितीमध्ये वीज बिलाची होळी करून या निष्क्रिय महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात येणार आहे तरी  या चंद्रपूर जिल्ह्याचा तमाम युवकांना आव्हान आहे की मोठ्या संख्येने  आपल्या हक्कासाठी घराच्या बाहेर निघा आणि या निष्क्रिय सरकारच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा असे आव्हान भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी केले.




Post a Comment

0 Comments