विज उत्पादक चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना २०० युनिट विज मोफत देण्यासाठी सरकारने धोरन तयार करावे - आ. किशोर जोरगेवार
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांच्याशी चर्चा , लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याची मागणी
चद्रपुर(राज्य रिपोर्टर) : विज उत्पादक असलेल्या चंद्रपूर जिल्हात कोळस्यावर आधारीत जवळपास ५ हजार मेगावॅटपेक्षा अधिक विज निमीर्ती केली जाते, प्रदूषणा स्वरुपाने याचा दुष्परीनामही चंद्रपूरकरांना सोसावा लागत आहे.
असे असतांनाही चंद्रपूरात विजदर अधिक आहे. हा चंद्रपूरकरांवर अन्याय असून विज उत्पादक जिल्हा म्हणून विशेष दर्जा देत या जिल्हातील नागरिकांना दरमहा २०० युनिट विज मोफत देण्यात यावी अशी मागणी आज पून्हा एकदा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून या मागणी संदर्भात चंद्रपूर जिल्ह्याच्या दौर्यावर असलेल्या ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांच्याशी चर्चा केली असून विज उत्पादक चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना २०० युनिट विज मोफत देण्यासाठी सरकारने धोरन तयार करावे अशी मागणी केली आहे तसेच यावेळी लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करण्यात यावी अशी मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ऊर्जा राज्यमंत्री यांना केली आहे.
विधानसभा निवडणूकी पूर्वी पासूनच चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना २०० युनिट विज मोफत देण्यात यावी अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी लावून धरली होती. आता आमदार होताच या मागणीच्या पूर्ततेसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न चालविले आहे. विधानसभेच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी हा विषय सलग दोनदा अधिवेशनात मांडत सभागृहाचे लक्ष या विषयाकडे वेधले होते. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर मागणीचे पत्र पाठविले आहे. दरम्यान आज सोमवारी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर असतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय विश्राम गृह येथे त्यांची भेट घेवून या विषयावर सविस्तर चर्चा केली. चंद्रपूर जिल्हा हा विज उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे तयार होणा-या विजेवर मुंबईसारख शहर चकचकीत राहत. असे असतांना मुंबई पेक्षा अधिक विजदर चंद्रपूरकरांसाठी आकारले जात आहे. कोळस्यावर आधारीत विद्यूत केंद्र येथे असल्याने येथील प्रदुषनातही मोठी वाढ झाली आहे. याचे फलस्वरुप चंद्रपूरकरांना विविध प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. येथील प्रदुषनामूळे चंद्रपूकरांचे वयोमान ५ ते १० वर्षानी कमी झाले असून त्यांना, दमा, फुफुस रोग, श्वसनाचे आजार असे विविध प्रकारचे आजार होत आहे. या विद्यूत केंद्राचे येवढे दुष्परीनाम भोगत असतांनाही चंद्रपूर जिल्ह्यात विज महाग आहे. आमची विज आम्हालाच महागात विकल्या जाणे हा अन्याय असून या विज केंद्राच्या दूष्परीनामाचा मोबदला म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना दरमहा २०० युनिट विज मोफत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी ऊर्जा राज्यमंत्री यांना केली. याबाबतचे धोरन राज्यसरकाने लवकर तयार करावे अशी विनंती ही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. तसेच नागरिकांना देण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातील तीन महिन्याच्या वीज बिलात गैर प्रकार झाला आहे. धुणे-भांडे करणाऱ्या महिलांना तब्बल ३० हजार रुपयांचे बिल पाठविण्यात आले आहे. अश्या प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्यामुळे संपूर्ण वीज बिलांची पुनर तपासणी करण्यात यावी. अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी ऊर्जा राज्यमंत्री यांना केली आहे.




0 Comments