महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरपना येथे फळ वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.
कोरपना(राज्य रिपोर्टर) : राज्यमंत्री तथा महाराष्ट्रा राज्याचे लाडके मंत्री शेतकरी, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणारे दिव्यांग बांधवांचे कैवारी, यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज कोरपना तालुक्यातील प्रहार संघटनेच्या सेवकांनी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे फळ वाटप करत शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.
देशामध्ये कोरोनाचे संकट असून सामान्य जनता आर्थिक तथा मानसिक परिस्थिती ने हतबल झाली आहे. कोरोनाच्या संक्रमणाच्या काळात परिस्थिती गंभीर असून मा. बच्चू भाऊ कडू यांच्या सूचनेनुसार वाढदिवस उत्साहात साजरा न करता प्रत्येकानी एक वृक्ष लावून साजरा करण्याचे आव्हाहन केले.
बच्चू कडू यांच्या 5 लक्ष वृक्ष लागवडीच्या संकल्पनेतून आज कोरपना येथे प्रहार सेवकांनी फळ वाटप व वृक्ष लावून वाढदिवस साजरा केला यावेळी कोरपना प्रहार सेवक मोहबत खान,दिनेश राठोड,संदीप हंसकर, नदीम सय्यद,विनोद दुरुटकर यासह अनेक प्रहार सेवक उपस्थित होते.
0 Comments