घुग्घुस येथील वार्ड क्रमांक २ येथे भुमीगत नाली बनवा
युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांची मागणी
घुग्घुस(राज्य रिपोर्टर) हनिफ शेख :घुग्घुस गावातील वार्ड क्रमांक 2 झाडे ले-आउट परिसरातील मोठ्या नाली मधून गावातील सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना मलेरीया,डेंगु, कावीळ असे आजार होते आहे व लहान-मोठे अपघात होत असल्यामुळे त्या नालीवर झाकण बसविण्यात यावे किंवा तिला भूमिगत नाली बनविण्यात यावी या करीता युवा सेना तालुका प्रमुख हेमराज भाऊ बावणे यांनी ग्रामपंचायत येथे निवेदन देऊन मागणी केली आहे.
15 दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास घुग्घूस शिवसेना तर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतांना चेतन बोबडे, कोमल ठाकरे, मयुर झाडे ,अविनाश बुटले, महेश शेंडे, महेश किनाके वनवास फुलकर, रवी कामतवार शरद झाडे सर्व शिवसेना पदाधिकारी युवासेना पदाधिकारी व समस्त शिवसैनिक व वार्ड क्र.2 मधील महिला शिल्पा झाडे, अंजुषा मारबते,तबसुन बानो,नगमा सिद्धिकी, मंदा फुलकर ,नसरीन बानो, गुलनास कुरेशी उपस्थित होते.






0 Comments