चंद्रपूर बाधितांची संख्या 123 वर
आतापर्यत 62 कोरोनातून बरे;
61 बाधितांवर उपचार सुरू
चंद्रपूर शहर व पोंभुर्णा तालुक्यातील
मोहाळा येथून प्रत्येकी 1 बाधित
चंद्रपूर,दि.6 जुलै(राज्य रिपोर्टर):जिल्ह्यामध्ये सोमवारी सायंकाळी आणखी 2 पॉझिटिव्ह बाधितांची भर पडली आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 123 वर गेली आहे.नव्या 2 बाधितांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या भिवापूर वार्ड परिसरातील 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे. हैदराबाद शहरातून ही महिला चंद्रपूरमध्ये आली होती. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज तो पॉझिटिव्ह आला आहे.
दुसरा बाधित हा करंजी येथील पॉझिटिव्ह बाधितांच्या संपर्कातील आहे. पोंभूर्णा तालुक्यातील मोहाळा येथील 21 वर्षीय तरुण संस्थात्मक अलगीकरणात होता. काल स्वॅब घेण्यात आल्यानंतर आज तो पॉझिटिव्ह ठरला आहे. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह बाधितांची संख्या 123 झाली आहे. आत्तापर्यंत 62 जण कोरोना आजारातून बरे झाले असून 61 संक्रमितांवर सध्या उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील कोविड-19ची सर्वसाधारण माहिती:
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 6 हजार 525 स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 123 नमुने पॉझिटिव्ह, 5 हजार 622 नमुने निगेटिव्ह, 760 नमुने प्रतीक्षेत तर 20 नमुने अनिर्णीत आहेत.
जिल्ह्यातील अलगीकरण विषयक माहिती:
जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 939 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 168 नागरिक,तालुकास्तरावर 368 नागरिक तर, जिल्हास्तरावर 403 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 84 हजार 955 नागरिक दाखल झाले आहेत. 82 हजार 962 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 1 हजार 993 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित), 29 जून (एकूण 8 बाधित), 30 जून (एक बाधित), 1 जूलै (एकूण दोन बाधित), 2 जुलै ( 2 बाधित ), 3 जुलै ( एकूण 11 बाधित ), 4 जुलै ( एकूण 5 बाधित ), 5 जुलै ( एकूण 3 बाधित ) आणि 6 जुलै ( एकूण दोन बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित 123 झाले आहेत. आतापर्यत 62 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 123 पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 61 झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
0 Comments