घुग्घुस येथील विठ्ठल मंदिर देवस्थानाचे प्रवेश द्वार बांधुन द्या
घुग्घुस शिवसेना शहर प्रमुख बंटीभाऊ घोरपडे यांची मागणी
घुग्घुस(राज्य रिपोर्टर)हनिफ शेख : घुग्घुस येथील गांधी चौका जवळील विठ्ठल मंदिर देवस्थानाचे समोर नविन प्रवेश द्वार बांधुन देण्यात यावी अशी मागणी घुग्गुस शिवसेना शहर प्रमुख बंटीभाऊ घोरपडे यांनी घुग्गुस ग्रामपंचायतीला निवेदन देऊन केली आहे.
घुग्घुस येथील गांधी चौका जवळील विठ्ठल मंदिर देवस्थान आहे भक्त येथे आस्थेने दर्शनासाठी येतात व छोटो मोठे समारोह याठिकाणी पार पडतात. परंतु हे मंदिर आतील भागात असल्याने रस्त्यावरुन ये-जा करणारे नागरिकांना ते दिसत नाही त्यामुळे रस्त्यासमोर घुग्घुस ग्रामपंचायतीने याठिकाणी नविन प्रवेश द्वार बांधुन द्यावे अशी मागणी घुग्घुस शिवसेना शहर प्रमुख बंटीभाऊ घोरपडे यांनी केली आहे.
निवेदन देतांना युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, उपशहर प्रमुख योगेश भांदककर, बाळु चिकनकर, गणेश शेंडे, युवासेनेचे चेतन बोबडे, अविनाश बुटले,मयुर झाडे व शहंशाह व शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.



0 Comments