कृषि संजीवनी सप्ताहात वरोरा चंद्रपूर येथे कृषि विभाग व कृषि पदवीधर संघटना संयुक्त मार्गदर्शन कार्यक्रम


कृषि संजीवनी सप्ताहात वरोरा चंद्रपूर येथे कृषि विभाग व कृषि पदवीधर संघटना संयुक्त मार्गदर्शन कार्यक्रम

चंद्रपूर,(राज्य रिपोर्टर) : आज १ जुलै म्हणजेच कृषि दिन आणि महानायक वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस यानिमित्त महाराष्ट्र शासनाने दि. १ ते ७ जुलै या दिवसांत कृषि संजीवनी सप्ताह राबवण्याचे ठरविले आहे.

 या साठी कृषि मंत्र्यांनी कृषी पदवीधर संघटनेला या सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर विदर्भातील कृषि पदवीधर संघटना कार्यकर्ते आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सप्ताहात सहभागी झाले आहेत. आज चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बोरगाव (शिवनफळ) या गावातून कृषि संजीवनी सप्ताहाला संघटना कार्यकर्त्ये यांनी कृषि विभागाच्या सोबत सुरुवात केली. यावेळी टेमुर्डा कृषी मंडळाचे कृषी  सहाय्यक पी.एस. लोखंडे, जी. व्ही. देशमुख, एस.आर.इडोले, पी.एस.ढोले, डी.व्ही.चौरे तसेच ग्रामपंचायत सरपंचा सौ.रेखाताई आणि प्रगतशील शेतकरी श्री. बापूराव रामजी नन्नावरे व कृषी पदवीधर संघटनेचे विदर्भ सोशल मीडिया समन्वयक पंकज पंढरी घोटेकर, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष आकाश बंडूजी खोब्रागडे व सचिव मंथन मनोहर उराडे व गावातील समस्त शेतकरी उपस्थित होते.

 याप्रसंगी कृषी सहायकांनी १)शेतीचा खर्च कसा कमी करावा, 
२)कमी खर्चात जास्त नफा ३)खते व त्यांचे विविध पिकात व्यवस्थापन ४)निंबोळी अर्काचे फायदे
५) केंद्राचा व राज्याचा विविध पीक विमा व शेतकरी विमा योजना इत्यादी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिले. तर कृषी पदवीधर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १)बीजप्रक्रिया २)रासायनिक औषधीचे दुष्परिणाम
३) कापूस पिकावरील गुलाबी बोन्डअळी व रसशोषक किडे या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच प्रगतशील शेतकरी श्री बापूराव रामजी नन्नावरे यांचा शेतावर हळद, सोयबीन व कापूस या पिकाची पाहणी करण्यात आली. व आम्ही कृषि पदवीधर संघटना आणि कृषि विभागातील सहाय्यकांकडून जलयुक्त शिवार योजने बद्दल माहिती देखील या वेळी दिली गेली.

Post a Comment

0 Comments