वेकोलीच्या गौरी उपक्षेत्रात कऱोडोंचा आर्थिक ग़ैरव्यवहार : CBI तपासाची मागणी : भाजपा कामगार नेते अजय दुबे यांनी कोळसा मंत्रालयाला लिहिले पत्र


वेकोलीच्या गौरी उपक्षेत्रात कऱोडोंचा आर्थिक ग़ैरव्यवहार : CBI तपासाची मागणी : भाजपा कामगार नेते अजय दुबे यांनी कोळसा मंत्रालयाला लिहिले पत्र   

 बल्लारपुर,(राज्य रिपोर्टर) दिपक भगत : बल्लारपुर कोळसा क्षेत्रातील वेकोली अंतर्गत गौरी उपक्षेत्र अंतर्गत डारसल लॉजिस्टिक प्राइवेट लिमिटेड नामक कोल् ट्रांसपोर्ट कंपनी व वेकोली अधिकाऱ्यांच्या मिलीभगत नुसार आपल्या कर्मचाऱ्याचे शोषण करीत असल्याची माहिती आहे अशा कर्मचाऱ्याना त्वरित न्याय मिळवून देवून शासकीय नियमानुसार च त्यांच्याकडून काम करवून घेण्याची मागणी भाजपा कामगार मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्री अजय दुबे यांनी वेकोली प्रबंधन यांना लिहलेल्या पत्रात केली आहे सोबतच महाराष्ट्राचे माजी वित्त वन व नियोजन मंत्री श्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्फ़त केंद्रीय कोळसा मंत्री श्री प्रल्हादजी जोशी यांना निवेदन देवून CBI तपासणीची मागणी केली आहे कारण या संदर्भात कऱोडोंचा आर्थिक घोटाला असु शकते याशिवाय सदर कंपनीच्या कामगाराशी चर्चा केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार कामगाराकडून 12 ते 24 तासा पर्यन्त काम करवून घेतले जाते शिवाय न्यूनतम पगार तर मिळत नाही यासोबतच सर्वांचे EPF भरला जात नाही ज्यांचा भरला जातो त्यातही घोटाळा असु शकते याशिवाय कर्मचारी यांचा पगार बैंक च्या माध्यमातुन होत नाही कामगारासोबत डारसल कंपनी बंधुवा कामगारासारखा व्यवहार करीत असल्याची माहिती आहे हे सर्व व्यवहार गौरी ओपन कास्ट खदान चे मैनेजर, पर्सनल ऑफिसर, सेफ्टी ऑफिसर च्या मिलीभगत नुसार केली जात असल्याची माहिती आहे जर या प्रकाराची निष्पक्ष तपासणी CBI  च्या माध्यमातुन झाली तर सर्व सत्य बाहेर येईल तरी या कंपनीत कामगाराना न्याय मिळावा अशी मागणी भाजपा कामगार मोर्चा महासचिव अजय दुबे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments