घुग्घुस येथे दोन सट्टापट्टी अड्यावर एसडीपीओ पथकाची धाड


घुग्घुस येथे दोन सट्टापट्टी अड्यावर एसडीपीओ पथकाची धाड

९ लाख ३ हजार २४० रुपया चा मुद्देमाल जप्त

३१ आरोपींना अटक

घुग्घुस,(राज्य रिपोर्टर) हनिफ शेख : बुधवारला दुपारी म्हातारदेवी रोड व विद्या टाॅकीज जवळ ट्रक पार्कीग या दोन ठिकाणी चालणारे अवैध सट्टापट्टी अड्यावर चंद्रपुर एसडीपीओ पथकाने धाड टाकुन तब्बल ३१ आरोपींना अटक करीत नगदी रोख रक्कम, पंधारा दुचाकी, मोबाईल असा एकुण ९ लाख ३ हजार २४० रुपया चा मुद्देमाल जप्त करुन अटक करण्यात आली आहे. 
त्यामुळे घुग्घुस पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली.
मागील तिन महिण्यापासुन या दोन ठिकाणी जोमाने सट्टापट्टी व्यवसाय सुरु होता. परंतु घुग्घुस पोलीसांचे दुर्लक्ष होत होते त्यामुळे चंद्रपुर  उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी एक पथक घुग्घुस येथे पाठवुन तिन खाजगी वाहनासह दोन अड्यावर धाडसत्र राबविले.

Post a Comment

0 Comments