रोटरी क्लब ऑफ बल्लारपूरचा पदग्रहण सोहळा झूम मीटिंगद्वारे संपन्न


रोटरी क्लब ऑफ बल्लारपूरचा पदग्रहण सोहळा झूम मीटिंगद्वारे संपन्न

बल्लारपूर (राज्य रिपोर्टर) :  रोटरी क्लब ऑफ बल्लारपूरचा पदग्रहण सोहळा  ५ जुलै ला सकाळी 11 वाजता झूम मिटिंगद्वारे संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून 3030 चे असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन सुधीर ठाकरे,डिस्ट्रिक्ट कोऑरडीनेटर रोटेरियन राम चांदे, कॉन्फरन्स  कोऑरडीनेटर रोटेरियन वीरेंद्र हजारे,माजी असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन अरुण तिखे उपस्थित होते.
    कार्यक्रमात नवनियुक्त अध्यक्ष रोटेरियन वैभव मेनेवार यांनी मावळते अध्यक्ष रोटेरियन कल्पेश पटेल यांच्याकडून तर नवनियुक्त क्लब सचिव रोटेरियन निलेश चिमड्यालवार यांनी मावळते क्लब सचिव रोटेरियन अजय वासलवार यांच्याकडून पदभार स्वीकारला.यावेळी माजी अध्यक्ष रोटेरियन कल्पेश पटेल यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाचा लेखाजोगा विशद केला. तर नवनियुक्त अध्यक्ष रोटेरियन वैभव मेनेवार यांनी विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्याचा संकल्प केला.प्रमुख पाहुणे असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन सुधीर ठाकरे यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या संदेशाचे वाचन करून रोटरीबाबत माहिती सांगितली.पाहुण्याच्या हस्ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये नियुक्त झालेले व्हाईस प्रेसिडेंट रोटेरियन मनीष मूलचंदानी ,सेक्रेटरी प्रोजेक्ट्स प्रफुल चरपे, ट्रेझरर महेश कायरकर,आयपीपी कल्पेश पटेल,डायरेक्टर मेम्बरशीप चेअर प्रशांत दोंतुलवार,
डायरेक्टर पब्लिक इमेज प्रशांत भोरे,
डायरेक्टर T E A C H रवी साळवे,डायरेक्टर  यूथ सर्विस उमेश पटेल ,डायरेक्टर क्लब ऍडमिनिस्ट्रेशन हर्षद गंधेवार ,डायरेक्टर क्लब सर्विस पवन पवार,डायरेक्टर कम्युनिटी सर्विस (मेडिकल )राजू मुंधडा ,डायरेक्टर कम्युनिटी सर्विस (नॉन मेडिकल)अजय वासलवार,डायरेक्टर सर्जंट ऍट आर्म्स सुरेश कुकरेजा ,डायरेक्टर ग्रिटींग्ज चेअर विक्रांत पंडित, इगझेक्यटिव्ह  मेम्बर्स  रोटररियन शैलेश झाडे,उत्तम पटेल,अनुप गंगशेट्टीवार,गौरव मामीडवार,राहुल वरू, सचिन तल्हार, सुबोध कुमार,श्रवण बानासुरे, संतोष चौव्हान,सचिन पाल ,निखिल गुजरकर,डॉक्टर नितीन पेंदे,डॉक्टर प्रवीण धाडसे यांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले.
 कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन रोटेरियन महेश कायरकर यांनी केले तर आभार नवनियुक्त क्लब सचिव रोटेरियन निलेश चिमड्यालवार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments