तीन महिन्याचे वीज बिल माफ करा व पूर्ण कर्जमाफी करून नवीन कर्ज द्या
श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष तालुका कोरपना यांची मागणी तहसीलदार वाकले साहेब कोरपना यांना निवेदन सादर
चंद्रपूर,कोरपना (राज्य रिपोर्टर) : कोरपना तालुका आदिवासी गोरगरीब शेतकरी म्हणून आधीच ओळखला जातो कोरोना व्हायरस मुळे मागील तीन महिन्यापासून लॉकडावून असल्यामुळे शेतकऱ्यांना व इतर नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हते त्यामुळे पोट भरणे मुश्कील झाले तीन महिन्यापासून रोजगार नसल्यामुळे पैशाची आवक नाही जगणे मुश्कील झाले आहे त्यातल्या त्यात विद्युत महामंडळाने आपल्या गलथान कारभाराचा परिचय देत अतोनात विज बिल पाठवून दिले आहे पहिलेच शासनाने जाहीर केले की तीन महिने कोणतेही बिल भरू नका त्या हिशोबाने अनेक नागरिकांनी विद्युत चे बिल भरले नाही वीज बिल माफ होईल अशी आशा होती परंतु विद्युत महामंडळाच्या अनागोंदी कारभाराने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे विनंती करण्यात येते की तीन महिन्याचे विद्युत बिल त्वरित माफ करण्यात यावे तसेच महाराष्ट्र सरकारने सातबारा कोरा करू म्हणून घोषणा केली व सत्तेवर आले परंतु सातबारा कोरा तर सोडाच अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ आजपावेतो माफ झालेले नाही व त्यांना लोन सुद्धा मिळालेले नाही अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे करिता विनंती आहे की वीज बिल माफ करून सरसकट कर्जमाफी द्यावी शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष तालुका कोरपणा यांनी दिला आहे तसेच अनिल कवरासे, पद्माकर दगडी,निवृत्ती डोहे,दिवाकर ऊरकुडे भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदना मार्फत तहसीलदार वाकले साहेब यांना देण्यात आला आहे
0 Comments