जिल्ह्यात एकाच दिवशी 16 पॉझेटिव्ह रुग्णांची भर; एकाचा मृत्यु


जिल्ह्यात एकाच दिवशी 16 पॉझेटिव्ह रुग्णांची भर; एकाचा मृत्यु

यवतमाळ शहरातील 12 जण, नेर आणि पुसद येथील प्रत्येकी दोघांचा समावेश

यवतमाळ, (राज्य रिपोर्टर) : यवतमाळ जिल्ह्यात आज (दि.7) एकाच दिवशी 16 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 86 वर पोहचली आहे. तर यवतमाळ शहरातील 52 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने मृत्युचा आकडा एकाने वाढून 13 झाला आहे.
मंगळवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 16 जणांमध्ये 12 जण यवतमाळ शहरातील असून दोन जण पुसद येथील आणि दोन जण नेर येथील आहे. पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील सात पुरुष व पाच महिला, पुसद येथील दोन पुरुष आणि नेर येथील दोन महिलांचा समावेश आहे. 6 जुलैपर्यंत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 71 होती. एका महिलेचा मंगळवारी मृत्यु झाल्याने ही संख्या 70 वर आली. मात्र नव्याने 16 जण पॉझेटिव्ह आल्याने जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 86 झाली आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 110 जण भरती आहे.  
जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 345 वर पोहचला आहे. यापैकी 246 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात 13 जणांच्या मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी 47 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 6201 नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी 5795 प्राप्त तर 406 रिपोर्ट अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5450 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

Post a Comment

0 Comments